पनवेल कोळीवाडा येथील समाजसेवक दिलीप शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश..
पनवेल कोळीवाडा येथील समाजसेवक दिलीप  शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत  जाहीर पक्ष प्रवेश

पनवेल / प्रतिनिधी : - दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड  शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रमुख पनवेल प्रवीण जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल शहर व पनवेल कोळीवाडा येथील समाजसेवक दिलीप रामदास शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, मा.शहरप्रमुख अच्युत मनोरे, अनिल कुरघोडे, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, मा.नगरसेवक अनिल टेमघरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image