पनवेल महापालिका हद्दीतील दुकानांचे नाम फलक मराठीत लावणे बंधनकारक..

पनवेल महापालिका हद्दीतील दुकानांचे नाम फलक मराठीत लावणे बंधनकारक
पनवेल,/ दि.2 : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 2018 नूसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकानांचे नाम फलक मराठी लावण्यात यावे अशी नागरिकांनी मागणी केली होती. त्यानूसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपित असणे बंधनकारक असण्याचा कार्यालयीन आदेश आयुक्त  गणेश देशमुख यांच्या आदेशानूसार काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2018 च्या राजपत्रानूसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीत असणे बंधनकारक आहे. आस्थापनेचे मराठीतील नाव प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. आस्थापना चालक नामफलक मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. तथापि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. तसेच ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्रि किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरूषांची, गड –किल्यांची नावे देण्यात येऊ नये असे पालिकेच्यावतीने नमुद करण्यात आले आहे.
Comments