एक लाख रुपयांसाठी आईने पोटच्या मुलाला विकले ; पनवेल तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीसह मुलाला घेतले ताब्यात
एक लाख रुपयांसाठी आईने पोटच्या मुलाला विकले ; पनवेल तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीसह मुलाला घेतले ताब्यात

पनवेल, दि.7 (संजय कदम) ः ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाच्या मुलाला विकल्यानंतर आईने पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना झाली, परंतु सदर मुलाला पळवून नेणारे दांम्पत्य हे पनवेल तालुक्यातील बोर्ले या गावात वास्तव्यास असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता अथक परिश्रम करून अवघ्या 2 तासात सदर मुलाला आरोपींसह ताब्यात घेवून त्यांना कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 

पुण्यातील कोथरूड परिसरातून एका चार वर्षीय चिमुरड्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवातही केली. पण या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या मुलाच्या आईनेच एक लाख रुपयांत या मुलाची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नाही तर आईने ज्या व्यक्तीला हा मुलगा विकला होता, त्याने आणखी एका व्यक्तीला त्या मुलाची विक्री केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आठ जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
आईने तक्रार दाखल झाल्यानंतर गांभीर्य लक्षात घेऊन तपास आधिक वेगाने सुरु केला. कोथरुड, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यामार्फत 9 तपास पथकांमार्फत चिमुरड्याचा शोध सुरु केला. अपहरण झालेला मुलगा त्याच दिवशी बांगडीवाली भाभीसोबत (जन्नत बशीर शेख) होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन तपास सुरु केला. तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्या महिलेनं उडवाउडवीची उत्तरे दिली. पण खाकी दाखवल्यानंतर ती सर्व काही बरळली. ही चौकशी सुरु असताना दुसर्‍या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्येही एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी तीने गुन्ह्याची कबूली दिली. जन्नत बशीर शेख हिने सांगितले की, रेश्मा सुतार आणि तक्रार करणारी प्रियंका पवार यांच्या संगनमत व कट करुन चिमुकल्याचे अपहरण केलं. हा मुलगा तुकाराम निंबळे, मावळ याच्या मध्यस्थीने पनवेल तालुक्यातील बोर्ले गावात राहणार्‍या चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला. पोलिसांनी तात्काळ या दोघांचा शोध घेतला. यावेळी वपोनि जगताप यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांच्याशी संपर्क साधून सदर मोबाईलवरुन फोन लोकेशन हे बोर्ले गाव येत असल्याचे सांगितले. तातडीने रवींद्र दौंडकर यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळंदे, पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे, सहा.पो.उपनिरीक्षक मनोहर चव्हाण, पो.नाईक राकेश मोकल, पो.शि.भिमराव खताळ यांचे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी पाठवून चंद्रकला माळी आणि भानुदास माळी या दोघांना ताब्यात घेत मुलांबाबत विचारपूस केली. हा मुलगा एक लाख साठ हजार रुपयांना दिपक म्हात्रे यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जावून आरोपीला ताब्यात घेतलं अन् मुलाची सुटका केली. 
पोलिसांनी भादवि कलम 370, 368, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.  या सर्वांना न्यायालयात हजर केले असतान 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने अवघ्या 2 तासात या मुलाला शोधून काढल्याबद्दल पुणे परिमंडळ 3 च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहा.पो.आयुक्त गलांडे यांनी वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.



फोटो ः अवघ्या दोन तासात ताब्यात घेतलेला मुलगा
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image