मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने आयोजीत हळदी कुंकू समारंभाला उत्तम प्रतिसाद..
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने आयोजीत हळदी कुंकू समारंभाला उत्तम प्रतिसाद
पनवेल / प्रतिनिधी : - नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभाग १८ मध्ये नाविन्यपूर्ण आणि समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. माता भगिनींशी असलेला संवाद वाढवा आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून त्यांना काही क्षण विरंगुळ्याचे मिळावे या हेतूने आयोजीत 'हळदी कुंकू' कार्यक्रमाला  महिला वर्गाने उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी वाण म्हणून भेटवस्तू माता भगिनींना देण्यात आले.यावेळी मनोरंजन हेतूने संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा आणि इतर खेळ घेण्यात आले.माता भगिनींनी या खेळांमध्ये सहभाग घेऊन मनोसोक्त आनंद लुटला.कोरोना काळातल्या निर्बंधांमुळे महिलांना एकत्रित जमणे शक्य होत नव्हते पण नगरसेवक विक्रांत पाटील यांनी "हळदी-कुंकू" कार्यक्रम आयोजीत करून आम्हाला बऱ्याच दिवसांनी एकत्र येण्यास आणि खेळांच्या माध्यमातून विरंगुळ्याचे क्षण लुटण्यास माध्यम दिले त्याबद्दल सर्व महिला वर्गांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.

यावेळी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यावतीने त्यांच्या सौ मोहिनी विक्रांत पाटील यांनी आलेल्या सर्व माता भगिनींचे स्वागत केले.प्रभागातील सर्व माता भगिनींना हळदी कुंकू समारंभात भाग घेता यावा यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Comments