युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन...
युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

पनवेल / (प्रतिनिधी) रसायनी जवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिकेत तांडेल या युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. 
चार दिवसापूर्वी गुळसुंदे येथील अनिकेत अनिल तांडेल हा २६ वर्षीय युवक कामानिमित्त सकाळी पनवेलला जात होता. त्या दरम्यान रसायनी फाटा पार केल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याच्या स्कुटी दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिकेतला गंभीर इजा झाली आहे. विशेषतः त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्याच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. अनिकेतच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मित्र परिवार, ग्रामस्थ, महिला मंडळांनी अनिकेतच्या उपचारासाठी थोड्या बहुत प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. मात्र अनिकेतच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता उपचारासाठी मित्र परिवाराने मदतीचे आवाहन केले आहे. अनिकेतला मदत करण्यासाठी निकेश तांडेल ७०६६२०२७५७ किंवा स्वप्निल चौलकर ७०२८८८१७६८, किंवा प्रथमेश पाटील ९२२२२२२९८८  यांच्याशी संपर्क साधावा.
Comments