92 हजार रुपये किंमतीच्या चप्पलच्या मालाची चोरी..
92 हजार रुपये किंमतीच्या चप्पलच्या मालाची चोरी

पनवेल, दि.15 (संजय कदम)- 92 हजार रुपये किंमतीच्या चप्पलच्या मालाने भरलेल्या बॉक्सची चोरी झाल्याची घटना पनवेल शहरात घडली.
          शहरातील नवरंग शू मार्केट यांचे विविध प्रकारचे पादत्राणे, सॅंडल व इतर साहित्याने भरलेला 92 हजार रुपये किंमतीचा माल असलेला बॉक्स हा दुकानाबाहेर ठेवला असता अज्ञात चोरट्यांनी सदर बॉक्स पळवून नेल्याने याबाबतची तक्रार मेघजी वाविया यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पोलिसांची पथके सदर अज्ञात चोरट्याचा शोध चोहोबाजूस करीत आहेत.
Comments