राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला उत्साहात सुरुवात...
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला उत्साहात सुरुवात

पनवेल ः प्रतिनिधी : -  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवारी (दि. 28) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात सुरुवात झाली. 
नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून महाअंतिम फेरीचे उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने, सहप्रायोजक नील ग्रुपच्या कल्पना कोठारी आदी उपस्थित होते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे फक्त सांस्कृतिक व्यासपीठ नसून कलाकार निर्माण करणारे व्यासपीठ असल्याचे सांगून नगरसेवक अनिल भगत म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर हे लोकांना एक व्यासपीठ कसे निर्माण करता येईल असा विचार करून कार्यरत असतात. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सर्वव्यापी विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम या व्यासपीठामार्फत केले जाते. आपली सगळ्यांची साथ आम्हाला अशीच राहील आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या मदतीने आम्ही पुढे वाटचाल करीत राहू.
प्रमुख थिएटर्स मुंबईच्या ‘तिडीक’ या एकांकिकेच्या प्रयोगाने स्पर्धेच्या महाअंतिम स्पर्धेला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभरात नऊ एकांकिका सादर करण्याचे नियोजन होते. या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच नाट्यगृहात प्रवेश दिला जात आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image