संकल्प फाऊंडेशनतर्फे पत्रकारांचा सत्कार...
संकल्प फाऊंडेशनतर्फे पत्रकारांचा सत्कार
पनवेल ः प्रतिनिधी 
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कामोठे येथील संकल्प फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या पत्रकारांचा गुरुवारी (दि. 6) पत्रकार दिनी सत्कार करण्यात आला. 
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असताना पत्रकारांचे समाजातील योगदान मोलाचे आहे. याचीच दखल घेत कामोठे येथील संकल्प फाऊंडेशनच्या वतीने पनवेल महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व सा. पनवेल टाईम्सचे संपादक गणेश कोळी, दै. रामप्रहरचे वृत्तसंपादक समाधान पाटील, दै. नवराष्ट्रचे प्रतिनिधी प्रशांत शेडगे, सा. स्टार पनवेलचे संपादक अनिल राय, ‘रामप्रहर’चे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर यांना उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
या कार्यक्रमास संकल्प फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष वैशाली जगदाळे, सचिव कलापी जाधव, भाजप सोशल मीडिया पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी पत्रकारांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments