शिवसेना पनवेल महिला आघाडीतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न..
शिवसेना पनवेल महिला आघाडीतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न..
पनवेल / प्रतिनिधी : -  पनवेल शिवसेना महिला आघाडीतर्फे २६ जाने. रोजी शिवसेना पनवेल शहर शाखेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी पनवेल मधील जवळपास १५० महिलांची  उपस्थिती लाभली, यावेळी महिला आघाडीच्यावतीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासोबत सर्व महिलांना भेट वस्तू देखील देण्यात आल्या. 
याप्रसंगी उपजिल्हासंघटीका कल्पना पाटील, तालुका संघटीका प्रमिला कुरघोडे, उपतालुका संघटीका सुनंदा पाटील, उपशहर संघटिका सौ उज्वला गावडे, विभाग प्रमुख प्र.क्र .१९  हर्षाली परायेकर,विभाग प्रमुख प्र.२० क्र . रेश्मा कुरुप, शाखा प्रमुख प्र.१९  सुचिता शिर्के, युवती सेना शहर संघटिका स्वराली सावंत, उपशहर संघटिका कोमल कुरघोडे, नानी कुरघोडे, उर्मिला कुरघोडे, वैशाली कुरघोडे, प्रतिक्षा कुरघोडे, निलिमा कुरघोडे, सोनल मारणे, सुरेखा चाळके,रूणा साळुंखे,चंदा माटे, रुपाली आग्रे आदी पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Comments