अल्पवयीन गतिमंद मुलीस पनवेल पोलिसांनी सुखरूपपणे दिले तिच्या आईच्या ताब्यात ..
पनवेल / वार्ताहर : - मिलन राजाराम चोरगे, वय 29 वर्ष, रा वाकडी, ता.पनवेल यांना एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष अंदाजे 13 ही सकाळी सुमारे 11:30 वा.आपटा फाटा, वाकडी येथे फिरत असताना मिळून आल्याने त्यांनी तिला पनवेल तालुका पोलिस स्टेशनला आणले असता तिच्याकडे SHO PSI भरत पाटील व WPN लाड यांनी विचारपूस करता सदर मुलीस काहीएक बोलत येत नव्हते व ती गतिमंद असल्याचे दिसून आले.त्त्यांनी तात्काळ वाकडी चौकीचे पोहवा ओबासे व पोना हिंदुराव कदम यांना सदर मुलीचा व्हाट्सअप द्वारे मोबाइलवर फोटो पाठवून त्यांना सदर मिळून आलेल्या मुलीच्या नातेवाइकांचा सर्वत्र शोध घेण्यास सांगितले.
सदर पोलीस अमंलदारानी तात्काळ शोधकार्य सुरु केले त्यांना वाकडी गावाजळ काही जण एका मुलीचा शोध घेत असताना आढळून आले त्यांना सदर मुलीचा मोबाईल मधील फोटो दाखविला असता त्यांनी सदर मुलगी त्यांची हरवलेली मुलगी असल्याचे सांगितले.
सदर मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आल्यानंतर योग्य ती खात्री करून सदर मुलीस तिची आई वय वर्ष 33, रा:-पंढरपूर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर अल्पवयीन व गतिमंद मुलीस पोलिसांनी सुखरूपपणे तिच्या आईच्या ताब्यात दिल्याने तिची आई व नातेवाइकांनी नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले.