महापालिकेकडून शिवसेना पक्षाचे फलक काढण्याची होत असलेली कारवाई थांबविण्याची शिवसेनेची मागणी...
महापालिकेकडून शिवसेना पक्षाचे फलक काढण्याची होत असलेली कारवाई थांबविण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल ,दि.10 (वार्ताहर) ः पनवेल महापालिका क्षेत्रात शिवसेनेच्या विचारांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होवून समस्त शिवसैनिक समाज हिताचे काम करतात. महाराष्ट्र शासनाने लोकहितासाठी घेतलेले समाज हिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने शहरातील प्रत्येक चौकात फलक लावून लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम शिवसेना शाखेतून करण्यात येते. परंतु राजकीय कुलशित हेतूने शिवसेना पक्षातर्फे लावण्यात आलेले चौकातल माहिती फलक आपया कार्यालयीन कर्मचार्‍यांकडून काढण्यात येत आहे. सदरहू माहिती फलकाबाबत कोणत्याही व्यक्तींची हरकत अथवा तक्रार सुद्धा नसताना फलक काढण्याची होत असलेली कारवाई थांबविण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सदर माहिती फलकावर मुख्यमंत्री तथा अनेक मंत्र्यांचे फोटो असतात. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो असतो. सदरहू सुचना फलक काढत असताना आपले कर्मचारी सदरहू माहिती फलक हे असभ्यरित्या काढत आहेत. जेणेकरून वंदनिय नेत्यांचा अपमान होत आहे. आपल्या कार्यालयाकडून शिवसेना शाखेस सदरहू माहिती फलक काढण्याबाबत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. माहिती फलक हे समाजोपयोगी कामाकरिता व सरकारी निर्देश लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता लावण्यात आलेले आहे. जेणेकरून लोकांपर्यंत लोकहिताची माहिती पोहोचवली जाईल. शिवसैनिकांचा हेतू हा शुद्ध असल्या कारणाने आपण सरहूचे फलक लोकहिताचे असल्या कारणाने सदरहू माहिती फलकावर कारवाई करणे अत्यंत गैर असल्याचे रामदास शेवाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच शहरातील तथा महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून अनेक व्यवसाय थाटलेले आाहेत. सदरहू बेकायदेशीर अतिक्रमणांवर कोणतेही कारवाई होत नाही. पदपथावर देखील अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहेत. सदर अतिक्रमणांबाबत महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा फेरीवाले व सरकरी जमिनीवर अतिक्रमण करणार्‍यांवर कोणतीही कायदेशीर कावाई न करता त्यांना सरंक्षण दिले जाते. पनवेल महापालिका अतिक्रमण विभागाकडून शिवसेनेच्या फलकावर होत असलेली कारवाई थांबवली नाही तर आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा रामदास शेवाळे यांनी दिला आहे.
फोटो ः रामदास शेवाळे
Comments