स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त करण्यात आला पत्रकारांचा सत्कार..
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त करण्यात आला पत्रकारांचा सत्कार
पनवेल दि.06 (वार्ताहर)- स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातील पत्रकारांचा जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी सत्कार केला. तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
            गोरगरिब जनता, मागासवर्गीय इतर मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय अत्याचाराविरूद्ध पत्रकार सातत्याने आवाज उठवित असतात. समाजातील भ्रष्टाचार नेहमीच ते बाहेर काढतात व दिनदुबळ्यांना न्याय देतात. त्यांच्या लेखणीत ताकद असल्याने अनेकांना न्याय मिळतो. अशा पत्रकारांचा सन्मान करणे हे आद्य कर्तव्य असून त्याच भावनेतून आज पनवेल परिसरातील पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
            फोटोः पत्रकार संजय कदम यांना श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सन्मानित करताना जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे
Comments