कृष्णा खारपाटील यांचे दुःखद निधन..
कृष्णा खारपाटील यांचे दुःखद निधन
चिरनेर ग्रामपंचायतचे माजी सदस्य, लोकनेते दि बा पाटील यांच्यासोबत अनेक शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेले  दिबांचे  विश्वासू सहकारी, शेतीनिष्ठ शेतकरी ,मल्लखांबपट्टू  कुस्तीगीर ,कृष्णा गणू खारपाटील यांचे  22 जानेवारी रोजी चिरनेर येथे  82 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  त्यांच्या तरुणपणी चिरनेर मधील दहीहंडी फोडणारा एकमेव गोविंदा अशी त्यांची ओळख होती. शेती,मासळी , बैल, बैलगाडी यांच्यात ते आयुष्यभर रमले. त्यांच्या पश्चात  पत्नी राधा,  दिपक, ज्योती , कांचन ही त्यांची मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

पत्रकार मिलिंद खारपाटील यांचे ते काका. त्यांचे दशक्रिया विधी चिरनेर खाडी येथे 31 जानेवारी रोजी होणार असून अंतिम कार्य 2 फेब्रुवारी रोजी चिरनेर येथील राहत्या घरी होणार आहे.
Comments