नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंगचे आयोजन...
नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंगचे आयोजन...
पनवेल / वार्ताहर : - मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणकाळात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मर्यादा आल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. व्यायाम व मैदानी खेळ यापासून सुद्धा विद्यार्थी लांब होत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. विद्यार्थ्यांना निसर्ग सानिध्यात नेऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व्यायाम होण्याच्या उद्देशाने  नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी फणसवाडी खारघर येथे ट्रेकचे आयोजन केले.

खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी  तंदुरुस्तीचे महत्त्व व मानसिक ताणतणाव, चिंता व डिप्रेशन दूर करण्यासाठी अश्या प्रकारच्या ट्रेकचे महत्त्व खूप आहे असे मत मांडले. शुभांगी शिरतोडे यांनी मुलांना दातांच्या स्वच्छतेबद्दलची सखोल माहिती दिली. या ट्रेकला अर्चना सकपाळ, विजय भोसले, प्रदीप शेलार, धोंडा आप्पा देसाई, शैलेश मोरबेकर, रूपेश काकडे यांच्यासह पन्नास शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image