घन:श्याम नाईक हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या सरचिटणीस पदावरून बडतर्फ..
घन:श्याम नाईक हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या सरचिटणीस पदावरून बडतर्फ
भारतीय जनरल कामगार सेनेच्या सरचिटणीस पदावरून घन:श्याम नाईक यांना बडतर्फ करण्यात आले असल्याचे पत्र हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष श्रीपाद (अप्पा) पराडकर यांनी दिले आहे.

दुसऱ्या संघटनेशी संगनमत करणे, आपल्या संघटनेची बदनामी करणे, संघटनेत अंतर्गत कलह निर्माण करणे त्याचप्रमाणे संघटनेच्या नावाखाली आस्थापनांमध्ये परस्पर जाऊन कामगारांचे हित न जपता स्वतःचा स्वार्थ साधणे अशा प्रकारच्या घटना संघटनेच्या निदर्शनास आल्यामुळे संघटनेने पदावरून तसेच संघटनेमधून बडतर्फ करण्यात आले असल्याचे पत्र देण्यात आले असून संघटनेच्या नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष श्रीपाद (अप्पा) पराडकर यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.
Comments