पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून एकाला केले जबर जखमी...
पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून एकाला केले जबर जखमी

पनवेल / दि.04 (संजय कदम): पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून एकाला जबरी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील पाले खुर्द गावातील एका चाळीत घडली आहे.
            ओमप्रकाश बरनवाल उर्फ पतलुराम (वय-45, रा.-पालेखुर्द) याला आरोपी मनोजकुमार व त्याच्या साथीदारांनी आपसात संगनमत करून पैशाच्या देवाण घेवाणीवरून ओमप्रकाश बरनवाल याला गंभीर मारहाणीची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि विनया पारासूर करीत आहेत.
Comments