झुकलेल्या विद्युत पोलामुळे नागरिकांच्या जीवाला धोका ; वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष..
झुकलेल्या विद्युत पोलामुळे नागरिकांच्या जीवाला धोका ; वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सावरकर चौक परिसरात असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल हे गंजलेले व एका बाजूला झुकले गेल्याने ते कधीही तेथून ये-जा करणाार्‍या लोकांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना होवू शकते. या संदर्भात स्थानिकांनी संबंधित खात्याकडे तक्रार करून सुद्धा त्या तक्रारीचे निवारण केले जात नसल्याबद्दल या परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील सावरकर चौक परिसरात असलेली श्री योग सोसायटी याच्या समोरील विद्युत पोल तसेच मारुती मंदिराच्या बाजूला असलेला विद्युत पोल हा गेल्या काही दिवसापासून एका बाजूला झुकला असून तो कधीही खाली पडण्याची शक्यता आहे. तसेच सदर विद्युत पुल हा गंजलेला व अनेक ठिकाणी सडत चालला आहे. त्यामुळे हे दोन्ही विद्युत पोल खाली पडल्यास मोठी दुर्घटना होवू शकते. तसेच त्यामुळे कित्येक काळासाठी विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत होवून शॉर्टसर्किट सारख्या घटना सुद्धा घडू शकतात व हे कोणाच्या जीवावर तरी बेतू शकते. अत्यंत जुन्या काळातील हे विद्युत पोल उभारले असून त्याची अवस्था सध्यातरी दयनिय व जीर्ण झालेली आहेत. त्यामुळे हे दोन्ही विद्युत पोल तातडीने बदलण्याची गरज आहे. तसे न केल्यास मोठी दुर्घटना होवून जिवीतहानी सुद्धा होवू शकते. तरी याकडे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून हे विद्युत पोल बदलावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

फोटो ः जीर्ण झालेले विद्युत पोल
Comments