राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारीला पनवेलमध्ये ..
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारीला पनवेलमध्ये 
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची  लाभणार उपस्थिती;  

सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अँबेसिडर

ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांचा 'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने होणार सन्मान 

पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये होणार असून या स्पर्धेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची उपस्थिती लाभणार असून या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने आहेत, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज (दि. १९) खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  
          या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन गौरव करण्यात येणार आहे.तसेच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे मान्यवर व्यक्तींचा या वर्षीपासून जीवन गौरव स्वरूपात 'गौरव रंगभूमीचा' हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यंदा या पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे असणार आहे, अशीही माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली.  
सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस अभिनेते ओमकार भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीता पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, अभिनेते भरत सावले, सीकेटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. के. पाटील, अभिषेक पटवर्धन, श्याम पुंडे, स्मिता गांधी, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 
सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पुढे सांगितले कि, नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो.  जळगाव, नागपूर, पुणे, पनवेल, रायगड या राज्यातील सर्व केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडल्या असून अंतिम फेरीसाठी २५ एकांकिकांची निवड झाली आहे. कोरोना संदर्भात नियमांचे पालन करून अंतिम फेरी २८, २९ आणि ३० जानेवारी २०२२ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image