स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरून हिंदुहुदयसम्राट ज्योत कळंबोलीत दाखल..
स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरून हिंदुहुदयसम्राट ज्योत कळंबोलीत दाखल
मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते ज्योतीचे उद्घाटन
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह शिवसैनिकांची हजेरी

पनवेल वैभव : राज भंडारी
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हासल्लागार बबन पाटील, यांच्यासह शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जमले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते हिंदुहुदयसम्राट ज्योतीला प्रारंभ करून पनवेलच्या दिशेने रवाना करण्यात आली. रोहिंजण येथील सूनित कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून या ज्योतीचे गेले ७ वर्षे नियोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षीच्या हिंदुहुदयसम्राट ज्योतीचे नियोजन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मॅरेथॉनची पारितोषिके पटकाविणाऱ्या कमळ्या (कमलाकर) भगत यांनी ३५ किलोमिटर अंतर एकटेपणाने पार करण्याचा निश्चय साकार केला.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे रायगड जिल्ह्यात आणत असताना सर्वप्रथम शिवतीर्थ ते कळंबोली असे आगमन झाले होते, त्यावेळेपासून गेली ७ वर्षे  बाळासाहेब ठाकरे यांची ज्योत आणण्याचा पायंडा सुरू झाला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत,जिल्हासल्लागार बबन पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम,  पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, आयोजक पनवेल तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर आणि सुमित कृष्णा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उप महानगरप्रमुख दीपक घरत, शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, माजी शहरप्रमुख खारघर शंकरशेठ ठाकूर, कळंबोली शहरप्रमुख डी.एन.मिश्रा आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी हिंदुहृदसम्राट ज्योतमध्ये सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. यामध्ये संदीप पाटील, विशाल पवार, जयेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, महेश मढवी, दिनेश म्हात्रे, सचिन म्हात्रे, विकास पाटील, अमित पाटील, बारक्या पाटील, सुमित पाटील, धीरज पाटील, राकेश पवार, दीपक पाटील, महेंद्र पाटील, ऋषी पाटील, करण पाटील, अक्षय पाटील, परेश हाळे, चंद्रकांत, सिद्धू म्हात्रे, बाळाराम गायकवाड, रोशन पाटील, मकरंद घरत, राजा म्हात्रे, नरेश ढाले, मोहीम शेख, मंगेश खांडगे, गणेश खांडगे, स्वयम खांडगे, भरत शिंदे, संतोष सहाणे, मल्हार खांडगे, चेतन देवराय, कामेश थोरात, राजेश केणी, निकेश घरत, सचिन मोरे, संजय शेडगे, कृष्णकांत कदम, सुरेश भगत, जगन भगत, पप्प्या पारधी, नरेश भगत आणि कमलाकर (कमळ्या) भगत आदींसह शिवसैनिक उपस्थित राहिले होते.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image