मातोश्रींचा अखेरचा श्वास असलेले ठिकाण आमच्यासाठी स्मारक - जिल्हाप्रमुख शिरीष घरत
पनवेल /प्रतिनिधी : -
अखंड हिंदूंचे रक्षणकर्ते हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक तलवार आणि त्यांच्या लढ्यात ढाल बनून राहणाऱ्या शिवसैनिकांच्या मातोश्री स्व.मीनाताई ठाकरे. अखंड शिवसैनिकांसह इतर राजकीय पदाधिकारीही आदराने सन्मान करायचे अशा मातोश्रींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अखंड भारतात आजचा दिवस ममता दिन म्हणून साजरा केला जातो. आज पनवेल तालुक्यातील शेडू॑ग याठिकाणी मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला होता, त्याठिकाणी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या माध्यमातून स्व.मीनाताई ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाचा उद्घाटन सोहळा ममता दिनाच्या निमित्ताने जिल्हाप्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक माधव भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखंड भारतातून त्यांना अभिवादन करण्यात येत असते. ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत ते मातोश्री म्हणजे कोणते मातृत्व हे जगासमोर ठेवत असते मात्र अखंड महाराष्ट्रातील जनतेला मातोश्री म्हणजे काय हे वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या झंजावातात मातोश्री मीनाताई ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. जर बाळासाहेब हे तोफगोळा असतील तर मीनाताई ह्या तोफ होत्या, जर बाळासाहेब हे तलवार असतील तर मीनाताई ह्या ढाल होत्या अशी व्याख्या बनण्यास वेळ लागणार नाही. शिवसेना घडवण्यात मीनाताईंनी वेळोवेळी आपले सामर्थ्य दाखविल्याचे अनेक संदर्भ इतिहासात कोरले आहेत. शिवसैनिकांची माय म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पेलल्या आणि झेलल्या देखील. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घोडदौडीत त्यांनी बाळासाहेबांपेक्षाही शिवसैनिकांची काळजी अधिक घेतली, आणि म्हणूनच कट्टर शिवसैनिकांनी त्यांना आईचा दर्जा दिला. आजही संपूर्ण रायगड जिल्हास्तरीय शिवसेनेचे नेते पनवेल तालुक्यातील शेडुंग याठिकाणी पोहोचले आणि माॅऺसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले.
यावेळी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ज्येष्ठ शिवसैनिक माधव भिडे, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, परेश पाटील, सल्लागार रमेश गुडेकर, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उप महानगरप्रमुख दीपक घरत, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उप तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, भिंगार शाखाप्रमुख संदीप घोगरे, प्रकाश पाटील, प्रितम घोगरे, अनिल फडके, रुपेश शेंद्रे, दिलीप घोगरे, मारुती म्हात्रे, नरेश पाटील, दिलीप पाटील, विष्णू लहाने, कैलास पाटील, प्रतीक पाटील, धनाजी घोगरे, ज्ञानेश्वर पाटील, निलेश शेंद्रे, राम माळी, लक्ष्मण पाटील, काना घरत, कृष्णा शेंद्रे, सुमित दास, महेंद्र पाटील, नरेश पाटील, यतीन देशमुख, ज्ञानेश्वर भंडारी, डी.एन.मिश्रा, किरण पाटील, संदीप तांडेल, नरेश भगत, महिला आघाडीच्या रायगड उपजिल्हा संघटीका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटीका सौ. प्रमिला कुरघोडे, ग्रामीण तालुका संघटीका अनिता डागरकर, पनवेल शहर संघटीका अपूर्वा प्रभु, पनवेल शहर संघटीका सौ.कुलकर्णी, शिवसेना पनवेल उपतालूका प्रमुख सौ. संगिता संजय भंडारकर, गुळसुंदे विभाग प्रमुख सौ.नूतन रमाकांत पाटील, उपसरपंच वावेघर शिवसेना सौ. श्रुती ज्ञानेश्वर माळी आदींसह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.