विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पनवेल पत्रकार मंचाने केला पत्रकार दिन साजरा...
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पनवेल पत्रकार मंचाने केला पत्रकार दिन साजरा
नैपुण्यप्राप्त  विद्यार्थ्यांचा केला सन्मान

पनवेल / प्रतिनिधी : - पत्रकार दिनाचे निमित्ताने आणि ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने भोकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप केले. तसेच गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत ने पुण्य प्राप्त केलेल्या मंचातील सदस्यांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला.
मराठी वृत्तपत्र क्षेत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मंचाचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या, पेन असे शैक्षणिक साहित्य तसेच टूथपेस्ट,टूथब्रश,मास्क असे स्वच्छता किट आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
        आपले मनोगत व्यक्त करताना माधव पाटील म्हणाले की पनवेल तालुका पत्रकार विकास मंच हा सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे. दर वर्षी नित्यनेमाने दुर्गम ग्रामीण विभागातील मुलांना आम्ही शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप करत असतो. सत्कार समारंभ आणि पुरस्कारांचे नेत्रदीपक सोहळे आयोजित करण्या पेक्षा दुर्गम ग्रामीण विभागात जाऊन तेथील लोकांच्यात उतरून त्यांच्यात मिळून मिसळून काम करण्यात खरा आनंद प्राप्त होतो. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यातील प्रत्येक सदस्य एखाद्या क्रिकेट टीम सारखे सहभागी होत असतात. प्रत्येक सदस्याचे योगदान असते. सर्वत्र माझ्या नावाचा गवगवा होत असला तरी देखील मी नाममात्र कर्णधार आहे खरी मेहनत ही मंचातल्या प्रत्येक सदस्याची आहे.
      भोकरपाडा येथे झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष माधव पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, उपाध्यक्ष हरीश साठे,खजिनदार नितिन फडकर, विवेक मोरेश्वर पाटील,संजय कदम,अविनाश कोळी,अनिल कुरघोडे, अनिल भोळे,राजेंद्र पाटील,राजू गाडे,प्रवीण मोहोकर,मयूर तांबडे, भरत कुमार कांबळे, स्वर्गीय बाबू हशा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय पाटील, खजिनदार रुपेश फुलोरे,कल्पेश फुलोरे,हनुमान फुलोरे,किशोर फुलोरे शिक्षिका समृद्धी सुधीर पाटील,प्रकाश राजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image