पनवेल परिसरातील दुकानावरील पाट्या मोठ्या अक्षरात व मराठीत असाव्यात अन्यथा युवा सेना रस्त्यावर उतरणार..
पनवेल परिसरातील दुकानावरील पाट्या मोठ्या अक्षरात व मराठीत असाव्यात अन्यथा युवा सेना रस्त्यावर उतरणार

पनवेल, दि.19 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासनाने (ठाकरे सरकार) राज्यभरातील दुकानावरील पाट्या मोठ्या अक्षरात मराठीत तसेच सोबत आपल्या आवडीनुसार तर कोणत्याही भाषेत लहान अक्षरात लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्वच दुकानधारकांना विशिष्ट वेळ देऊन पालिकेच्या माध्यमातून पाट्या मराठीत लावण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने करावे अन्यथा युवा सेना आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरुन कारवाई करेल असा इशारा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या  निवेदनात युवा सेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांनी दिला आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहीते पनवेल शहर अधिकारी सनी टेमघेरे, खारघर शिवसेना संघटक रामचंद्र देवरे, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव नवीन पनवेल अधिकारी, निखील दिघे  युवा सेना अधिकारी संकेत पाटील, सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अवचित राऊत यांनी सांगितले की, आम्ही सुद्धा आवाहन करणार आहोत, पनवेल महापालिकेने सुद्धा अशा प्रकारे आवाहन करून ठराविक मुदतीमध्ये सर्व फलक शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मराठी लावावेत, तद्पश्‍चात ही मुजोर दुकानदार प्रशासनाचा निर्णय मानत नसतील तर त्यांच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करून पाट्या मराठीत लावण्यास भाग पाडू व त्याची सर्वस्वी जबाबदारी दुकानदारांची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments