पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील यांची निवड...


पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील यांची निवड
पनवेल,/ दि.११:  पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र समिती अ, ब, क, ड सभापती तसेच उपमहापौर, स्थायी समिती सभापती व महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडणुका आज झाल्या.यामध्ये उपमहापौरपदी सीताताई पाटील यांची निवड झाली. स्थायी समिती सभापतीपदी नरेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. महिला -बालकल्याण सभापतीपदी हर्षदा उपाध्याय यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती 'अ'च्या सभापतीपदी संजना कदम यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती 'ब'च्या सभापतीपदी प्रमिला पाटील यांची निवड झाली. प्रभाग समिती 'क'च्या सभापतीपदी अरुणा भगत यांची निवड झाली. प्रभाग समिती 'ड' सभापतीपदी वृषाली वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.


आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये पिठासीन अधिकारी(जिल्हाधिकारी) डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली.यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार,  सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते. ही विशेष बैठक विहीत सामाजिक अंतर राखून व आरोग्य विषयक निकषांचे काटेकोर पालन करून आयोजित करण्यात आली. नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी देऊन अभिनंदन केले.

उपमहापौर पदासाठी सीताताई पाटील यांनी भाजप मधून आणि प्रिती जॉर्ज यांनी शेकाप मधून अर्ज भरला होता. सदर पदासाठी दोन उमेदवार असल्याने मतदान घेऊन निवड प्रक्रिया घेण्यात आली.यामध्ये सीताताई पाटील यांना ५० मते तर प्रिती जॉर्ज यांना २७मते पडली. २३मते अधिक मिळवून सीताताई पाटील यांची उमहापौर पदी निवड झाली.तसेच स्थायी समिती सभापतीपदी नरेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. महिला -बालकल्याण सभापतीपदी हर्षदा उपाध्याय यांची बिनविरोध निवड झाली.

प्रभाग समिती 'अ'च्या सभापतीपदी संजना कदम यांची बिनविरोध निवड झाली.प्रभाग समिती' ब' च्या सभापतीपदी प्रमिला पाटील व प्रिया भोईर यांनी अर्ज केला होता. सदर पदासाठी दोन उमेदवार असल्याने मतदान प्रक्रिया घेऊन सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रमिला पाटील यांना 13 व प्रिया भोईर यांना 7 मिळाली. सहा मते अधिक मिळवून सभापती पदी प्रमिला पाटील यांची निवड झाली.प्रभाग समिती 'क'च्या सभापतीपदी अरुणा भगत यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती 'ड' सभापतीपदी वृषाली वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.
Comments