मोटार सायकलस्वाराला चौकडीने लुटले...
मोटार सायकलस्वाराला चौकडीने लुटले...

पनवेल, / दि.3 (संजय कदम) ः अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल घेवून तालुक्यातील देवीचापाडा येथून येरमाळ येथे घरी जात असलेल्या एका इसमास चार चाकी गाडी आडवी घालून चार अज्ञात इसमांनी त्याला धमकावून व मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन काढून घेवून पसार झाल्याची घटना तालुक्यातील महाळुंगी येथील डॉग फॉर्मच्या समोर घडली आहे.
गौतम अंबो निरगुडा (22 रा.येरमाळ) हा त्याच्या ताब्यातील अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल घेवून तालुक्यातील देवीचापाडा येथून येरमाळ येथे घरी जात असताना चार चाकी गाडी आडवी घालून चार अज्ञात इसमांनी त्याला धमकावून व मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून घेेवून ते पळून गेले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image