बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाप्रबंधक अपर्णा जोगळेकर यांच्याकडे नवी मुंबई झोनचा पदभार ..
बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाप्रबंधक अपर्णा जोगळेकर यांच्याकडे नवी मुंबई झोनचा पदभार 

पनवेल, दि.19 (वार्ताहर): बँकिंग उद्योगातील अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी मुंबईचा अपर्णा जोगळेकर यांनी नुकताच पदभार सांभाळला. अपर्णा जोगळेकर हे उच्च विद्याविभूषित असून त्यांची एल. एल. एम., एम.एस. डब्लू. फॉरेन्सिक अँड मेडिकल जुरीस्प्रुडेन्स, ह्यूमन राईट्स पदव्युत्तर  व सायबर सुरक्षा  विषया मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची नुकतीच महाप्रबंधक पदी पदोन्नती होऊन ते नवी मुंबई झोन, वाशी येथे झोनल मॅनेजर म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांना बँकिंग क्षेत्रात प्रदीर्घ  असा अनुभव असून ह्या अगोदर बँकेच्या नासिक, अमरावती, सातारा व  पुणे येथे शाखा प्रबंधक व झोनल मॅनेजर म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेष उल्लेखनीय असे की त्यांनी बँकेच्या मुख्य कायदा अधिकारी म्हणून बँकेच्या प्रधान कार्यालय, पुणे येथे महत्वपूर्ण कारागिरी निभावली आहे. त्यांनी आपल्या बँकिंग करिअरची सुरुवात कायदा अधिकारी म्हणून केली आहे.

बँकेला विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई झोन अंतर्गत ४४ शाखांमध्ये त्यांची उत्कृष्ट कामगिरी राहणार आहे. त्यांनी पदभार सांभाळल्या बद्दल बँकेच्या नवी मुंबई झोन मध्ये व रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन सर्वत्र आनंद व्यक्त होऊन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अपर्णा जोगळेकर यांनी समूह भावना व सकारात्मक दृष्टिकोन   ठेऊन नवी मुंबई झोन नक्कीच आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करून बँकेला प्रगती पथावर नेईल असा विश्वास व्यक्त केला आहे.अपर्णा जोगळेकर यांनी पदभार सांभाळा त्याबद्दल उप प्रबंधक, अमित सुतकर, मुख्य प्रबंधक दिलीपकुमार उपाध्याय व मनीषा शर्मा यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

        
फोटोः अपर्णा जोगळेकर
Comments