नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..
नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 

नवीन पनवेल : नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पनवेल येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 4 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
      पनवेल तालुक्यात होत असलेल्या नैनाला शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध आहे. हा प्रकल्प रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांतर्फ़े एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जातणार आहे. या लाक्षणिक उपोषण द्वारे शेतकरी नैनाला असलेला विरोध दाखवणार आहेत. सरकारने हा प्रकल्प जबरदस्तीने लादल्यास शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या लाक्षणिक उपोषणला शेतकरी बांधव व इतरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
Comments