गॅस गोडावून चोरी करणार्‍या दोघांना तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात...
गॅस गोडावून चोरी करणार्‍या दोघांना तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात...

पनवेल, दि.3 (संजय कदम) ः गॅस गोडावूनमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आत प्रवेश केलेल्या दोघा जणांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ओनस एचपी गॅस एजन्सीमध्ये घरफोडी करण्याच्या उद्देशाने लोखंडी कटावणीने व लोखंडी पकडीने आरोपी जलालउद्दीन चौधरी (40) व राजकुमार गौड (32) यांनी आत प्रवेश केला असता याची माहिती फिरोज चाँद व त्याच्या सहकार्‍यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने तळोजा पोलिसांशी संपर्क साधून त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या अटकेमुळे इतर जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments