गोवा येथे मा.गृहराज्यमंत्री राम शिंदे व आ.प्रशांत ठाकूर यांनी साधला पत्रकारांशी संवाद..
गोवा येथे मा.गृहराज्यमंत्री राम शिंदे व आ.प्रशांत ठाकूर यांनी साधला पत्रकारांशी संवाद
गोवा / म्हापसा : - ४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेची निवडणुक येत्या १४ फेब्रुवारीला होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भारतीय जनता पार्टीने गोवा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. गोवातील ६-सीओलीम या मतदारसंघात सध्या ते प्रचार करीत आहेत. पनवेलच्या पत्रकारांनी आपल्या गोवा भेटीदरम्यान माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची म्हापसा येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा आदी उपस्थित होते.
Comments