श्री वर्धमान स्थानकवासी जैन मेवाड नवयुवक मंडल आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
श्री वर्धमान स्थानकवासी जैन मेवाड नवयुवक मंडल आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल / प्रतिनिधी : -  श्री वर्धमान स्थानकवासी जैन मेवाड नवयुवक मंडल उपसंघ पनवेल आयोजित मोफत आरोग्य शिबीर पनवेल येथील मालडूंगे गावात आयोजित करण्यात आले होते, शिबिरास आजू बाजूच्या आदिवासी वाड्यां मधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

सदर शिबिराचा आजूबाजूच्या गावांमधून जवळपास दोनशे लोकांनी लाभ घेतला, या मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.) मधुमेह (शुगर) इ.सी.जी (E C G) तसेच सर्व साधारण तपासणी करण्यात आली, या शिबिरास डॉ. निखिल पिसे,डॉ.स्वप्नाली पवार, डॉ.ममता शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

श्री वर्धमान स्थानाकवासी जैन मेवाड नवयुवक मंडल उपसंघ पनवेलचा अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभाग असून नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण तसेच प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्यात बहुमूल्य योगदान देत आहेत.

सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी मेवाड उपसंघ पनवेल प्रमुख शैलेंद्र खेरोदिया, अध्यक्ष ललित चंडालिया,महामंत्री महावीर सोलंकी, उपप्रमुख दिलीप खेरोदिया,रोशनलाल ईदोदिया, उपाध्यक्ष जयंती परमार,मार्गदर्शक दिलीप संघवी,शिवसेना मा.शहर प्रमुख सुनीत ठक्कर, नवयुवक मंडल प्रमुख जितेश मारू,अध्यक्ष प्रमोद सुराणा,महामंत्री मुकेश इंटोडिया,कोषाध्यक्ष रिखभ बनवट, विजय श्रीमाल, उमेश कुमठ, विनोद वडालमिया,सुनिल लोढा,विनय बम्ब,लोकेश कोचेटा, अंकुश हिंगड,राजेश सांखला,महावीर संचेती,महेंद्र कुकडा, ललित इंटोदिया, आदी नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments