ऑनलाईन सव्वा लाखाची फसवणूक...
ऑनलाईन सव्वा लाखाची करण्यात आली फसवणूक

पनवेल, / दि.30 (संजय कदम)- तुमचे एसबीआयचे योनो अकाऊंट कार्ड आज ब्लॉक होणार आहे त्यासाठी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करा असे सांगून एका इसमास सव्वा लाखांची फसवणुकीची ऑनलाईन घटना ओएनजीसी कॉलनी पनवेल येथे घडली आहे.
          याठिकाणी राहणारे जलाधर बेज (वय-36) यांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांचेतुमचे एसबीआयचे योनो अकाऊंट कार्ड आज ब्लॉक होणार आहे त्यासाठी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करा असे सांगून त्यांच्या खात्यातून सव्वा लाखांची फसवणुकीची घटना घडल्याने याबाबतची ऑनलाईन फसवणुकीची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments