मोबाईलमध्ये तरूणीचे चित्रीकरण करून तिच्या मित्राला धमकावणाऱ्या इसमास अटक..
मोबाईलमध्ये तरूणीचे चित्रीकरण करून तिच्या मित्राला धमकावणाऱ्या इसमास अटक..

पनवेल दि.04 (वार्ताहर): एका तरूणीचा पाठलाग करून तिच्याकडे एकटक पाहून स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे व्हिडीओ शुटींग केल्याने याबाबतची विचारणा सदर तरूणीच्या मित्राने केल्यावर त्याला शिवीगाळ करून धमकावणाऱ्या इसमास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.
            आज्ञान राठोड (वय-22) हे या तरूणाचे नाव असून त्याने लाईफलाईन हॉस्पिटलसमोर एका तरूणीचा पाठलाग करून तिच्याकडे एकटक पाहून स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे व्हिडीओ शुटींग केल्याने याबाबतची विचारणा सदर तरूणीच्या मित्राने केल्यावर त्याला शिवीगाळ करून धमकावल्याबद्दलची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करताच म सपोनि मोनाली चौधरी यांनी सदर तरूणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Comments