उघड्या डी पी दुरुस्त, तसेच विद्युत उपकेंद्र सुरु करणे यासाठी कामोठे कॉलोनी फोरमची महावितरण कार्यालयावर धडक..
उघड्या डी पी दुरुस्त करणे, विद्युत उपकेंद्र सुरु करणे यासाठी कामोठे कॉलोनी फोरमची महावितरण कार्यालयावर धडक
पनवेल / वार्ताहर : -  कामोठे शहरामधे अनेक ठिकाणी महावितरणने बसविलेल्या डी पी बॉक्स गंजलेल्या अणि तुटलेल्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी डी पी बॉक्स ओपन असुन त्यामधील विद्युतवाहक तारा फुटपाथवर आलेल्या आहेत. त्यामूळे नागरिकांना येण्याजाण्यास अडथळा निर्माण होतो तसेच भविष्यात ह्या तारांमधून विद्युतप्रवाह लिक झाल्यास नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. अनेक डी पी बॉक्स हे ओपन असल्यामुळे त्यामधील स्विच अणि इतर विद्युत उपकरणांना लहान मुले स्पर्श करु शकतात त्यामूळे त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.  शहरातील अनेक ठिकाणी डी पी बॉक्स तसेच ट्रान्सफार्मरच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे अणि गवत वाढले असुन त्यामूळे वायरमनला तिथे पोहचण्यास अडथळे येत असुन देखभाल दुरुस्तीच्या कामात विलंब होतो. या बाबत अनेक तक्रारी कामोठे कॉलोनी फोरमच्या समन्वयकांकडे प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत आज कामोठे कॉलोनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्री. सरोदे  यांची भेट घेतली . 
यावेळी निवेदनासोबतच शहरातील विविध ठिकाणच्या डी पी चा जवळपास  पन्नास फोटो चा अल्बम अभियंता दाखवण्यात आला.  विषयाचे गांभीर्य लक्षात घेता कार्यकारी अभियंता सुर्यतळ यांना जॉइंट पाहणी करण्यास सांगितले तसेच पुढील 15 दिवसांत सर्व डी पी बॉक्स दुरुस्त करण्याचे आदेश दिलेत. 
तसेच कामोठे शहरातील वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामोठे शहराचे स्वतंत्र उपकेंद्र सुरु करण्याची मागणी फोरम च्या वतीने करण्यात आली. त्यावेळी कामोठे शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्राचा प्रस्ताव मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवल्याचे अभियंत्यांनी सांगितले. लवकरच मंजुरी मिळवून कामोठे उपकेंद्राचे काम सुरु करुन वीजपुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरोदे यांनी दिली. 
या प्रसंगी कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, कॉलोनी फोरमचे समन्वयक बापू साळुंखे, डॉ. गारळे, राहुल बुधे, अरुण जाधव, संतोष अलदार, भरत उतेकर, रविंद्र पाधी, सुनिल कदम अणि संदीप इथापे आदी उपस्थित होते.
Comments