आईसह मुलगी बेपत्ता...
आईसह मुलगी बेपत्ता...
पनवेल, दि. ९ (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एका महिलेने आपल्या लहान मुलीला घेवून कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कळंबोली वसाहतीमधील केएल-5, सेक्टर 3 येथे राहणारी सकीना जमील शहा (23) व त्यांची एक वर्षाची मुलगी हलीमा ह्या दोघी हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे. सकीना यांची उंची 5 फूट, रंग गहुवर्णीय, भाषा हिंदी, केस काळे  लांब, डोळे काळे, नाक सरळ, बांधा मध्यम, चेहरा गोल असून अंगात गुलाबी रंगाची सलवार सुट व सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आहे. तर हलीमा हिचा रंग गोरा आहे. या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पो.ना.सुनील मासुळ यांच्याशी संपर्क साधावा.

फोटो ः बेपत्ता सकीना व हालीमा.
Comments