अल्पवयीन मुलीचा पनवेल शहर पोलिसांनी घेतला शोध...
अल्पवयीन मुलीचा पनवेल शहर पोलिसांनी घेतला शोध...

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून कोणी तरी अज्ञात इसमाने तिच्या कुटुंबियांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच विशेष पथकाने सदर मुलीला ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हा दाखल होताच व.पो.नी.अजय कुमार लांडगे, यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे  पळवून नेलेल्या मुलीचा मोबाईल बाबत तांत्रिक तपास करून व गोपनीय माहिती मिळवून शोध घेतला असता सदरची मुलगी धमोत, नेरळ तालुका कर्जत येथे मुला सोबत असल्या बाबत माहिती प्राप्त झाली होती त्या मुळे सदर ठिकाणी जावून शोध घेतला असता पळवून नेलेली मुलगी ही त्याच्या ताब्यात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून मुलीस तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून ,फुस लावून पळवून नेलेल्या मुलास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. या तपासकामी पोनी प्रशासन विजय कदबाने, पोनी गुन्हे संजय जोशी, पो.उप. नि. अभयसिंह शिंदे, पो.हवा. रविंद्र राऊत, पो. ना.विनोद देशमुख, पो. शी. प्रसाद घरत, पो.शी.विवेक पारासुर, पो.शी. युवराज राऊत, पो.शी.संतोष मिसाळ, म.पो.शी.गोलावार यांनी विशेष मेहनत घेतली. याबद्दल सदर मुलीच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Comments