शिवसेनेची भूमिका नेहमीच पोलिसांसह शासकीय अधिकार्‍यांना सहकार्याची असते ः शिवसेना उपमहानगरप्रमुख यतीन देशमुख
शिवसेनेची भूमिका नेहमीच पोलिसांसह शासकीय अधिकार्‍यांना सहकार्याची असते ः  शिवसेना उपमहानगरप्रमुख यतीन देशमुख
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः शिवसेनेची भूमिका नेहमीच पोलिसांससह शासकीय अधिकार्‍यांना सहकार्याची असते. त्यामुळेच शिवसेना जेव्हा अन्याय होतो तेव्हा मदतीला धावून जाते व या कामी पोलिसांचे सुद्धा सहकार्य घेते, असे प्रतिपादन शिवसेना उपमहानगरप्रमुख यतीन देशमुख यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वपोनि विजय कादबाने यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा देताना केले.
यावेळी त्यांच्यासोबत उपशहर प्रमुख ज्ञानेश्‍वर भंडारी, अविनाश गव्हाणकर, कु. सिद्देश गुरव, गोविंद जोग आदी पदाधिकारी उपस्थित राहिले होते. विजय कादबाने हे यापूर्वी सुद्धा पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते व त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. त्यानंतर वाहतूक शाखा, गुन्हे शाखा युनिट नं.3 आदी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कामाचे वरिष्ठांनी वेळोवेळी कौतुक केले आहे. आज पनवेल शहर हे परिमंडळ 2 मध्ये अत्यंत गर्दीचे पोलीस ठाणे आहे. 
या ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे नोंदणीसाठी येतात व त्यांची उकल सुद्धा होत असल्याने पोलिसांबद्दल पनवेल वासियांना एक आत्मियता आहे. अनेक अधिकार्‍यांनी याठिकाणी कार्यरत असताना आपली छाप सोडली आहे. तशीच कामाची आपली वेगळी छाप वपोनि विजय कादबाने सोडतील असा विश्‍वास यतीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. 


Comments