विहिघर येथे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितिची सभा संपन्न ; ४ जानेवारीला पनवेल येथे उपोषण...

विहिघर येथे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितिची सभा संपन्न ; ४ जानेवारीला पनवेल येथे उपोषण...  


पनवेल / वार्ताहर : - हनुमान मंदिरविहिघर येथे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिति आणि शेतकरी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ४ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ उपोषण करणार असल्याचे नामदेवशेठ डके यांनी सांगितले. 

विमानतळामुळे होत असलेल्या राक्षसरुपी नैनाचा नाश करायचा आहे त्यामुळे या नैनाला मोठ्या प्रमाणात विरोध होत  हे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या व नावापुरते शेतकरी म्हणून ठेवणाऱ्या नैनाला मोठ्या प्रमाणावर पनवेल तालुक्यात विरोध होताना दिसून येत आहे. नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिति गेल्या आठ वर्षापासून आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे. या सभेदरम्यान शेतकरी बांधवांनो, या नैनाला हटवायची हे गाणे वाजवीण्यात आले.

               पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे. नैना म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास मात्र शेतकऱ्यांना भकास करणारे आहेत. यावेळी नैनाविरोधात एकत्र लढलो तर नक्कीच यश मिळेल. असे एडवोकेट विजय गडगे यांनी सांगितले. तर सांगडे येथील स्मशानभूमी भोकरपाडा येथे काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे येथील प्रेत २० किलोमीटरवर आनायच का असा सवाल सुरेश पवार यांनी केला. अधिवेशनात आमदार नैनाचा प्रश्न उस्थित करत नसतील तर रायगड मधील आमदार अधिवेशनात जाता कशाला असा सवाल अनिल ढवळे यांनी केला. नैनामुळे सध्या घर बांधताना देखील भीती वाटत आहे. सिडको धंदा कत आहे, व राजकीय पुढारी विकले गेले आहेत. त्यामुळे आपल्या गावाचा विकास आपण करू शकतो असे अनिल ढवळे यांनी भाषणात सांगितले. नैनामध्ये ज्या गावाची जागा गेली आहे त्यांना त्याच गावात जागा द्या अन्य गावात जागा कशाला देता हे सर्व बेटरमेंट चार्ज मिळण्यासाठी केले जात असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. आपला फायदा करून घ्यायचा असेल तर संघटना मजबूत झाली पाहिजे. पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येने मंत्रालय समोर मोर्चा न्यायला तयार राहा असे या सभेत सांगण्यात आले. घरात बसून राहिलो तर नुकसान होईलआपण सारे पेटून उठलो पाहिजे आणि या सरकारला घाम फोडले पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. नैनाचा कारभार नियोजनशून्य असल्याचा आरोप राजेश केणी यानी करत गेल्या आठ वर्षापासून एकही वीट रचली नसल्याचे सांगितले. लवकरच काही गावांमध्ये शेकडो घरे तुटणार आहेत, याविरुद्ध आवाज उठवायला हवाशासन झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरे देत आहेत मात्र घरात राहणार्यांना उध्वस्त करून झोपडीत राहायला पाठवणार आहे का असा सवाल राजेश केणी यानी उपस्थित केला. त्यामुळे  ही नैना नकोच असा सुर पुन्हा आळविण्यात आला. नैना ही गेंड्याच्या कातडीची असल्याचे सुभाष भोपी यांनी सांगून मोर्चा काढण्याची सूचना केली. 

              येत्या ४ जानेवारी रोजी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. नैनाप्रकल्पात शेतकऱ्याला ४० टक्के मिळणार नसून केवळ ३२ टक्के जागा मिळणार असल्याचे जॉईंट एम डी यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यासमोर सांगितले असल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले. या सभेला नामदेवशेठ फडकेसुरेश ठाकूर, वामन शेळकेसुभाष भोपीसुरेश पवारराजेश केणी,  अनिल वळे,  नरेंद्र भोपीनारायण पाटील,  सुनील पाटीलजगन फडकेसुदाम वाघमारेरविंन्द्र फडकेमदन गोवारीकुंदा पवारबाळाराम फडकेरमेश पाटीलदिलीप फुलोरे, डि के भोपी, बबन फडके, गजानन पाटील, शेखर शेळके, सुरेश पाटील, रामचंद्र फुलोरे, रामचंद्र वाघमारे  यांच्यासह अनेक उपस्थित होते.

Comments