२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार द्रोणागिरी महोत्सवाला प्रारंभ..
 २ जानेवारी रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार द्रोणागिरी महोत्सवाला प्रारंभ.
उरण / प्रतिनिधी ,दि 30 : -  द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हा स्तरीय 21 वा युवा महोत्सव दि 2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन एम एस ई (सेझ )मैदान, पोलीस चौकी जवळ, केअर पॉईंट हॉस्पिटल समोर,बोकडवीरा, तालुका उरण येथे मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना विषयक सर्व नियम व अटींचे पालन करत सोशल फिजिकलं डिस्टन्स पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून नियमांच्या अधीन राहून संपन्न होणार असून विविध देशी विदेशी असे 132 हुन अधिक स्पर्धांचा या म्होत्सवात समावेश आहे. 
यावर्षी या स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते होणार असून अनेक मंत्री, दिग्गज नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध व्यक्ती, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होणार आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,क्रीडा मंत्री सुनील केदार,मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे,शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर,काँग्रेस नेते महेंद्र घरत, आर सी घरत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, भावना घाणेकर,डॉ मनिष पाटील, जे एन पी टी चे विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, उद्योगपती राजेश डाके, दिपक शेलार-शेलारमामा यांचे वंशज, नारायण कलमबे-नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज(  मुलगी उमा कडून  ,रमेश सोनावणे-महावीर चक्राने सन्मानित कृष्णाजी सोनावणे यांचे सुपुत्र,उत्तम पिंपळे-पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर, योगेश अवसरे-सिने अभिनेता,मनीष ठोंबरे-चित्रपट कलावंत ,सिने अभिनेता शशांक दरणे, सरिता खेरवासिया-सिने अभिनेत्री,,तारादीदी-प्रजापिता ब्राह्मकुमारी  ईश्वरीय विद्यालय पनवेल सेवा केंद्र  प्रमुख, संतोषदीदी-अध्यक्ष सहयोग स्नेह सेवा संस्थांन,डॉ मधु मिलिंद निमकर-रायगड सुंदरी,साक्षी परांजपे-सिने अभिनेत्री,  वर्षा पडवळ...सिने अभिनेत्री प्रमुख मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे. तसेच द्रोणागिरी भूषण पुरस्कार, विशेष पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रसिक प्रेषक वर्गांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.
Comments