श्री साई नारायण बाबा आश्रमात , श्री महाचंडी महायज्ञ संपन्न ...
श्री साई नारायण बाबा आश्रमात , श्री महाचंडी महायज्ञ संपन्न ...
   
पनवेल / वार्ताहर : -   पनवेलच्या रेल्वे स्टेशन मार्गावरील श्री साई नारायण बाबा आश्रमात (श्री साई मंदिर) 61वा विश्वशांती श्री महाचंडी महायज्ञ संपन्न झाला.या महायज्ञासाठी देश-विदेशातील भक्त उपस्थित होते.
          मानव कल्याण, विश्वशांती आणि धर्मस्थापना या उद्देशाने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. 13 यज्ञकुंड,21 शास्त्री यांच्या मंत्रोपच्चाराने विधिवत महायज्ञ पूर्ण करण्यात आला. सद्गुरु श्री साई नारायण बाबा आपल्यात नसताना हा महायज्ञ होत असल्याची भावना भाविकांनी दुःखद अंतकरणाने व्यक्त केली.
          साईबाबांची मंदिरे स्थापन करणे,गरीब-गरजूंची सेवा करणे ही शिकवण सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांनी दिली आहे. सद्गुरु श्री साई नारायण बाबा हे यापूर्वी शिर्डीला न चुकता दरवर्षी या महायज्ञाचे आयोजन करत होते,आता हा महायज्ञ पनवेलमध्ये होत आहे.
      या महायज्ञाच्यावेळी गोदान करण्यात आले.सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांचे विचार,महाचरण पूजा तसेच आरती आणि महाप्रसाद यांचा भाविकांनी मनोभावे लाभ घेतला.
          या श्री महाचंडी महायज्ञाचे आयोजन श्री भगवती साई संस्थानचे चेअरमन खेमचंद गोपलानी,सेक्रेटरी रामलाल चौधरी, कोऑर्डिनेटर राम थंदानी यांनी उत्कृष्टरित्या केले.
Comments