भंगार सामान चोरणाऱ्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात....
भंगार सामान चोरणाऱ्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात....

पनवेल दि.05 (संजय कदम): टाटा टेंपोमध्ये भरलेले भंगार सामान चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
            प्रेमचंद डांगी यांचे रिद्धी सिद्धी बिल्डींग, शॉप नं- 6 व 7 पनवेल याठिकाणी दुकान असून त्यांच्या दुकानासमोर त्यांनी टाटा टेंपो उभा केला होता व त्यामध्ये विविध प्रकारचे लोखंडी पाईप, एलबो, चारचाकी वाहनांची क्लचप्लेट असे हजारो रूपयांचे सामान ठेवले होते. सदर माल एका गोणीत भरून ठेवला होता. त्या मालाची चोरी आरोपी शादाब मेमन (वय-23) याने केली असता पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील गिरी, दिपक शेळके आदींच्या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे.
Comments