फोर्ड इंडिव्हर गाडीची वॅगेनार गाडीस धडक ; ४ जखमी..
फोर्ड इंडिव्हर गाडीची वॅगेनार गाडीस धडक ; ४ जखमी

पनवेल, दि.29 (संजय कदम) ः पनवेल जवळील कळंबोली-पुणे हायवे रोडवर अमेठी युनिव्हर्सिटी समोरच एका फोर्ड इंडिव्हर गाडीच्या चालकाने त्याच्या पुढे चाललेल्या वॅगेनार गाडीस जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात त्या गाडीतील 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रोनित धर (29 रा.ठाणे) या त्याच्या ताब्यातील फोर्ड इंडिव्हर गाडी क्र.एमएच-43-एआर-0001 हा घेवून मुंबई ते पुणे जाणार्‍या एक्सप्रेसवरील कि.मी.11/400 येथून चालला असताना त्याने त्याच्या पुढे चाललेल्या व्हॅगेनर गाडी क्र.एमएच-14-जीयु-1797 हीला पाठीमागून जोरदारपणे धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर गाडीतील लालमोहम्मद रुकमोद्दीन शेख (35), सुकाराम पुरकाराम चौधरी (45), बन्सी बहादूर गौतम (42) व इदरील रहमत चौधरी (44) सर्व रा.पुणे हे जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments