एक गाव एक संघ संकल्पनेतून पालेबुदृकमध्ये क्रिकेटचा थरार ; १० डिसेंबरपासून सुरू होणार क्रिकेट सामने ..
एक गाव एक संघ संकल्पनेतून पालेबुदृकमध्ये क्रिकेटचा थरार ; १० डिसेंबरपासून सुरू होणार क्रिकेट सामने ..
शिवसेना तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या हस्ते उद्घाटन...

पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः तालुक्यातील पालेबुदृक येथील पालेश्‍वरी क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यामार्फत एक गाव एक संघ या संकल्पनेतून भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर पासून सलग 4 दिवस पार पडणार आहे. या सामन्यांचा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. 
4 दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण 32 संघांचा समावेश करण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये प्रथम येणार्‍या संघास 50 हजार रुपये आणि भव्य चषक तसेच द्वितीय संघास 25 हजार रुपये आणि भव्य चषक, तृतीय आणि चतुर्थ संघास 12 हजार 500 रुपये आणि चषक देवून गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर खेळाडूंना योग्य बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी एक गाव एक संघ या संकल्पनेतून आलेल्या संघांमधील 32 संघांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील संघ प्रमुखांनी पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या
 रुपेश उलवेकर - 9930833532, 
प्रशांत म्हात्रे - 9930922108, 
महेश पाटील - 8898042593 आणि 
सागर म्हात्रे - 9167284758 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments