शौर्य दिनासाठी स्वाभिमानी युथचे कार्यकर्ते भिमा कोरेगावला जाणार...
शौर्य दिनासाठी स्वाभिमानी युथचे कार्यकर्ते भिमा कोरेगावला जाणार...
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने भिमा कोरेगावला जाणार आहेत.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे जास्तीत जास्त कार्यकर्ते अभिवादन करण्याकरिता जाण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांना व शहराध्यक्षांना लवकरच कार्यक्रम सुचित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक व 18 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद पोट निवडणुकांसाठी उमेदवार उभे करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली.

Comments