घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक..
घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक ...

पनवेल दि.२१ (वार्ताहर): पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरु गोविंद वाघे (वय 35, वलप, आदिवासीवाडी), आणि शरद घनश्याम साहू (वय 40, गणेशनगर मुळगाव ओडिसा) अशी आरोपींची नावे आहेत.
        वलप येथील अजिंक्य बॅटरी फार्म येथे पत्र्यावरून चोरटे चढले. आणि त्यांनी तेथील शिसाच्या प्लेट, चांदीची मूर्ती, दोन मोबाईल आणि टीव्ही असा एक लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एसपी गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, प्रवीण पाटील, पोलीस नाईक प्रकाश मेहेर, पंकज चंदेले यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार यांच्यामार्फत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी बाबा ढाबा, हेदुटने फाटा येथे गुरु गोविंद वाघे आणि शरद साहू याला पोलिसांनी अटक केली. यावेळी आरोपींकडून पोलिस तपासात दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
        वलप येथील अजिंक्य बॅटरी फार्म मधील 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर केळवणे गावात शरद साहू याने केलेल्या चोरीत 11 हजार 500 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर तिसऱ्या गुन्ह्यात कसळखंड येथील चोरी मध्ये शरद साहू आणि अन्य एका आरोपीचा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये 13 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकवीस डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image