हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक ...
हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक ...

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः हद्दपारीची मुदत संपली नसताना तुर्भे येथील पावणे भागात परतलेल्या एका सराईत गुन्हेगाराला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. करण उर्फ हरी दिलीप गायकवाड (23) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पाहता परिमंडळ-1 च्या पोलीस उपआयुक्तांनी त्याला 16 ऑक्टोबर 2021 मध्ये ठाणे, रायगड, नवी मुंबई व मुंबई या भागातून एक वर्षासाठी हद्दपार केले हेते.  
तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाकडून ऑल ऑऊट ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस ठाणे हद्दीतील हिस्ट्रीशिटर, गुंड तसेच पाहिजे आरोपी, फरार आरोपी, माहितगार आरोपींची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती. सदरचे पथक रात्री 11. 30  वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना, पावणे येथील श्रमिकनगर मधील बिल्डींगच्या बाजुच्या मैदानातून एक तरुण पोलिसांना पाहून पळून जाताना निदर्शनास आला.  त्यामुळे पोलिसांनी त्याची धरपकड करुन त्याच्याकडे चौकशी केली असता, सदर तरुण हा करण उर्फ हरी दिलीप गायकवाड असल्याचे तसेच तो तुर्भे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार  असल्याचे आढळून आले. तसेच परिमंडळ-1 च्या पोलीस उपआयुक्तांनी त्याला 16 ऑक्टोबर 2021 मध्ये 1 वर्षासाठी ठाणे, रायगड, नवी मुंबई व मुंबई या जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केल्याचे तसेच त्याच्या हद्दपारीची मुदत संपली नसताना, तो कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हद्दीत परतल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी करण उर्फ हरी दिलीप गायकवाड याच्या विरोधात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image