रत्नमाला कर्णबधिर व मतिमंद विद्यामंदिर कळंबोली येथे दिव्यांग क्षमता महोत्सव संपन्न...
रत्नमाला कर्णबधिर व मतिमंद विद्यामंदिर कळंबोली येथे दिव्यांग क्षमता महोत्सव संपन्न...
पनवेल / वार्ताहर : - दिव्यांग सप्ताह निमित्ताने  कै. रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था संचालीत रत्नमाला कर्णबधिर व मतिमंद विद्यामंदिर कळंबोली आयोजित दिव्यांग क्षमता महोत्सवाचे आयोजन 8 डिसेंबर रोजी कळंबोली येथे करण्यात आले होते. 
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगत्वाची ओळख समाजाला करून देणे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात दिव्यांग यशस्वी व्यक्तींना सन्मानीत करणे हा होता असे संस्थेच्या अध्यक्ष माधुरी पंडित-आंबेरकर यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग सन्मानार्थी मध्ये कविता पाटील ( शैक्षणिक क्षेत्र ) विनोद देवकर ( क्रीडा क्षेत्र )देवेंद्र पाटील (शैक्षणिक क्षेत्र )शितल चव्हाण व रुकसार राईन ( कला क्षेत्र )यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. या कार्यकामात मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा मिळावा म्हणून फॅशन शो चे ही आयोजन करण्यात आले होते यावेळी यामध्ये सर्वसामान्य व दिव्यांग यांना एकत्रित करून सर्वसामान्यांप्रमाणे तेही कोठेही कमी नाहीत हाच उद्देश या शो मध्ये ठेवण्यात आला होता यावेळी फॅशन शो मिस, मि. आणि बेबी नवी मुंबई 2021 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
        बेबी नवी मुंबई २०२१ विजेता Winner- नव्या आंबेरकर, 1st Runner up - ऋत्विज होडगे , 2nd Runner up - प्रणिती जाधव झाले तर मिस नवी मुंबई २०२१ चे विजेता Winner - शितल चव्हाण (कर्णबधिर), 1st Runner up रानी जैसवाल  - 2nd Runner up - तनुजा म्हाडगुत  झाले तसेच मि. नवी मुंबई २०२१ चे विजेता Winner - भावेश फाळके 1st Runner up महेश काटारे (कर्णबधिर), - 2nd Runner up - तन्मय म्हात्रे, विजेते झाले. अनिकेत कुवेसकर व ज्ञानेश्वर बनगर यांनी हा शो कोरिओग्राफ केला होता तसेच परीक्षक म्हणून जयेश पाटील, धर्मेश कडू व माधुरी गमरे -जगे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून दिशा महिला मंच च्या अध्यक्ष निलम आंधळे उपस्थित होत्या. 
     त्यांच्यातील काम करण्याची क्षमता उत्साह मनाला अचंबित करणारी आहे  दिव्यांग करू शकत नाहीत अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही ते खरच खूप सक्षम आहेत फक्त त्यांना संधी हवी आहे आणि ती देण्याचा प्रयत्न नक्कीच दिशा व्यासपीठामार्फत करणार आहोत असेही आश्वासन यावेळी त्यांनी व्यासपीठावर दिले. त्यांच्याकडे पाहून आयुष्यात असणाऱ्या तक्रारी शून्य वाटतात उपक्रमाचे व आयोजकांच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक अमोल आंबेरकर यांनी केले हसत खेळत वातावरणात मुलांचा उत्साह वाढवत उत्तमरित्या हा उपक्रम पार पडला.
 दिलीप त्रिपाठी, बाळासाहेब हांडे तसेच सचिव अमित कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वरित्या पार पडला.
Comments