पनवेल परिसरात दत्तजयंती उत्साहात साजरी...
पनवेल परिसरात दत्तजयंती उत्साहात साजरी
पनवेल, दि.18 (संजय कदम) ः पनवेल शहर परिसरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
शहरातील श्री स्वामी समर्थ मठ मंदिर, नवनाथ मंदिर, दादा वाघिलकर यांचे दत्त मंदिर, पनवेल तालुका पोलीस ठाणे येथील दत्त मंदिर, कळंबोली पोलीस ठाणे येथील दत्त मंदिर, तळोजा पोलीस ठाणे, वाहतूक शाखा आदींसह विविध ठिकाणी दत्त मंदिरामध्ये यंदाही सालाबादप्रमाणे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे भक्त मंडळींनी दत्त जयंती साजरी केली. 
या निमित्ताने खिडूकपाडा येथे शेकाप महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास (अण्णा) अर्जुन भोईर यांनी यावर्षी साई समर्थ हॉस्पिटल (कामोठे), डॉ.रुपेश वडगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारे विविध ठिकाणी दत्त जयंती उत्साहात व भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

फोटो ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर हे सपत्नीक दत्तजयंतीनिमित्त पूजन करताना.
Comments