दुधे ब्रदर्स यांच्या प्रत्येक प्रोजेक्टला अध्यात्मिकची जोड ; पोलीस उपायुक्त विवेक पानसरे...
दुधे ब्रदर्स यांच्या प्रत्येक प्रोजेक्टला अध्यात्मिकची जोड ; पोलीस उपायुक्त विवेक पानसरे...
पनवेल वैभव /  दि.14 (संजय कदम) ः अध्यात्मिक वारसा लाभलेले दुधे ब्रदर्स यांच्या नवनव्या इमारतींच्या प्रोजेक्टमध्ये अध्यात्मिक जोड असल्याने तेथे राहणार्‍या नागरिकांना एक धार्मिक वातावरणात राहत असल्याचे जाणवते व हेच त्यांच्या कामाचे यश असल्याचे मत परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दुधे ब्रदर्स यांच्या मार्फत उलवे सेक्टर 3 येथील सी रेसिडेन्सी या 11 मजली नुतन इमारतीच्या लॉबिंगच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमास सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी.एस.गिल, यशस्वी उद्योजक व शिर्डी संस्थानचे माजी व्यवस्थापक सुरेश हावरे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, दुधे ब्रदर्सचे एकनाथशेठ दुधे, मॅनेजिंग डायरेक्टर, तुकारामशेठ दुधे, ज्ञानदेवशेठ दुधे, प्रोजेक्ट डायरेक्टर विकी दुधे आदी मान्यवर उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. 
यावेळी या इमारतीची मेन लॉबी हायटेक जीम, स्वीमिंग पुल, इनडोर गेम झोन, चिल्ड्रन्स प्ले एरिया व इतर अ‍ॅमॅनिटीज उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेेळी बोलताना सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी.एस.गिल यांनी सांगितले की, दुधे ब्रदर्स हे प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना पैशापेक्षा तेथे राहणारी माणसे महत्वाची आहेत हे त्यांच्या कामातून दिसून येते. त्यामुळेच त्यांनी नागरिकांना लागणार्‍या सर्व गरजा या इमारतीत पूर्ण केल्या आहेत. तर यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले की, दुधे ब्रदर्स आणि माझे पूर्वीपासूनचे संबंध असून समयसुचकता कशी असावी हे दुधे ब्रदर्सकडून शिकावे. ज्यावेळी या ठिकाणी जमीन घेण्यास तयार नव्हते. अशा वेळी दुधे ब्रदर्सने येथे जमीन घेतली व आज त्यांनी उभारलेेली इमारत ही एक अत्याधुनिक इमारत म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे उपक्रम आगामी काळात त्यांच्या हातून घडो अशा शुभेच्छा दिल्या. तर उद्योजक सुरेश हावरे यांनी सांगितले की, दुधे हे सर्वांना एकत्रित घेवून जाणारे कुटुंब आहे. त्यांचा कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम असो ते आवर्जून मला बोलवतात. यातूनच माणसे कशी जोडावीत हे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी सदर जागेचे मुळ मालक जानू धोपरकर व समाधान धोपरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अ‍ॅड.जगदीश उरणकर, उद्योजक उत्तम कोळी, आर्कीटेक ठाकरे, पत्रकार प्रदीप ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


फोटो ः दुधे ब्रदर्स यांच्या उपक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image