घरफोडीत रोख रकमेसह मोबाईल लंपास....
पनवेल, दि. ९ (वार्ताहर) ः घराच्या दरवाजा लगत असलेला पत्रा वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरात ठेवलेली रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये राहणार्या ललितकुमार गुप्ता यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजा लगत असलेला पत्रा वाकवून प्रवेश करून घरात असलेले 50 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन असा ऐवज चोरुन नेला आहे.