कळंबोलीतील उद्यानात अंधाराचे साम्राज्य सुरक्षारक्षक गायब, फुटबॉल शौकीनांची दहशत..
कळंबोली (दीपक घोसाळकर) : कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ६ मध्ये असणाऱ्या उद्यानामध्ये नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे .उद्यानामधील दिव्यांच्या खाली रात्री अंधार असतो. येथे सुरक्षा रक्षकच नसल्याने उद्यानात येणाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे. उद्यानात बेकायदेशीर फुटबॉल खेळत असलेल्या शौकिनांची दहशत फिरणाऱ्या नागरिकांना बसली आहे. रात्रीच्या वेळी दारुडे व गरदुल्याचे बस्तान या उद्याना मध्ये सतत असते. याबाबत येथील नागरिकांनी चिंता व्यक्त करून सिडको अथवा महापालिकेने चांगल्या सुविधा देण्याची मागणी केली आहे.
लाखो रुपये खर्च करून सुद्धा कळंबोली मधील रहिवाशांना स्वच्छ व सुस्थितीत सुंदर व हिरवीगार उद्याने मिळत नाहीत. वसाहतीमधील सेक्टर ६ मध्ये असणाऱ्या उद्यानावर सिडको व महापालिका लाखो रुपये खर्च करीत आहेत. तरीही येथील झाडे हिरवीगार दिसत नाहीत. पाण्याचा शिडकाव या झाडांवर केलेला दिसून येत नाही .सुरक्षा रक्षकच गायब असल्याने या उद्यानामध्ये फुटबॉल शौकीन खेळणारे मोठ्या प्रमाणावर सायंकाळच्या वेळी खेळताना दिसून येतात त्यामुळे एकतर धुळीचा लोट उद्यानांमध्ये उडत असतो. येथे फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांना फुटबॉल खेळणाऱ्या कडून प्रसाद मिळण्याची दहशत येथील नागरिकांना बसली आहे . उद्यानात फक्त एकच हाय मास्ट दिवे सुरू असल्याने आजूबाजूचे सर्व दिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या उद्यानात रात्रीच्या वेळी दारुडे, गर्दुले यांचे कायम बस्तान बसलेले असते .मात्र उद्यानाची देखभाल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे पूर्ण कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या कररूपाने मिळणाऱ्या पैशातून ऊद्यानावर जर लाखो रुपये खर्च होत असतील तर येथील नागरिकांना उद्यानात चांगल्या सुविधा का मिळत नाही असा संतापजनक सवाल येथील नागरिक महापालिका प्रशासनाला विचारत आहेत.याबाबत सिडको से कळंबोली येथील उद्यान अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी उद्याच उद्यानाला भेट देऊन याबाबतची पाहणी करून योग्य ती कारवाई करतो.