मामीचे दागिने घेऊन पळालेल्या भाच्याचा पोलिसांकडून शोध सुरु..
मामीचे दागिने घेऊन पळालेल्या भाच्याचा पोलिसांकडून शोध सुरु..

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः सीबीडी सेक्टर-5 मध्ये रहाणाऱया एका महिलेच्या भाच्यानेच तीचे दागिने व स्कुटी घेऊन पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. शिवा करपागविनायम असे या भाच्याचे नाव असुन सीबीडी पोलिसांनी त्याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  
या घटनेतील तक्रारदार अरुणा पिल्लई (39) या सीबीडी सेक्टर-5 मध्ये कुटुंबासह रहाण्यास असून त्यांचा भाचा शिवा करपागाविनायम याची काही महिन्यापुर्वी नोकरी सुटल्याने तो तीन-चार महिन्यांपासून अरुणा पिल्लई यांच्याकडे राहण्यास होता. गत 7 डिसेंबर रोजी अरुणा पिल्लई यांनी त्यांची सोन्याची चैन ओळखीच्या ज्वेलर्सकडून दुरुस्त करुन आणण्यासाठी त्याला दिली होती. त्यामुळे शिवाने सकाळी स्कुटीवरुन अरुणा पिल्लई यांना त्यांच्या कामावर सोडल्यानंतर तो ज्वेलर्सच्या दुकानात जातो असे सांगून गेला, मात्र तो परत आलाच नाही. अरुणा पिल्लई या जेवण्यासाठी दुपारी घरी आल्यानंतर शिवा घरी नसल्याचे व स्कुटी देखील नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्याचा मोबाईल फोन बंद असल्याचे व त्याने कपड्याची बॅग देखील नेल्याचे आढळुन आले. त्यामुळे अरुणा पिल्लई यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. शिवा हा भाचा असल्याने अरुणा पिल्लई यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेऊन त्याच्याकडे दागिने व स्कुटी दिली होती. मात्र त्याने त्यांचे 2 लाख 40 हजारांची सोन्याची चैन व स्कुटी घेऊन पलायन केल्याने अरुणा पिल्लई यांनी त्याच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार  दाखल केली.
Comments